लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. दीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जगभरातील चाहत्यांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपल्या आवाजाच्या जादूने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदींनी आपल्या सुमधूर आवाजाने देशाला मंत्रमुग्ध केलं. लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून त्या आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

सम्राज्ञीने गायलेली गाणी आजही चिरतरुण आहेत. लता दीदींनी आजवर 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे. लता दीदींच्या आजवरच्या कारगिरीला सलाम म्हणून सरकारनेही 2001मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव ‘हेमा’ असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी ‘लता’ असे नाव ठेवले.

You might also like