संजय जाधवच्या ‘लकी’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक प्रदर्शित

लकी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र येणार असून नुकतंच या चित्रपटाचे टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं आहे.

सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत यांच्यावर हे गाणे चित्रीत झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार सुपरस्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुण्यात हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. प्रेक्षकांनी माझ्यावर आणि माझ्या चित्रपटांवर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे. आणि मला विश्वास आहे, ‘लकी’ चित्रपटाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील’, असं संजय जाधव म्हणाले. दरम्यान, यो सचिन पाठकयांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केलं असून स्वरसाजही चढविला आहे.

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेल्या, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like