टायगर श्रॉफचा रॅम्बो चित्रपट बंद !

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने  रॅम्बो नावाचा हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हिंदी चित्रपट टायगर श्रॉफ सोबत बनवण्याची घोषणा केली होती, पण आता या चित्रपटाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, यामुळे अफवांच्या अफवा पसरल्या आहेत.  हा चित्रपट रद्द झाला आहे असा विचार करण्यास लोकांनी सुरवात केली आहे.

टायगर सोबत वॉर चित्रपट बनवताना सिद्धार्थला रॅम्बोचा रिमेक बनवण्याची कल्पना सुचली. टायगरचे स्टंट व कौशल्यपूर्ण भूमिका पाहून  दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

सिद्धार्थ आनंदने  वॉर या चित्रपटात बॉक्स ऑफिसवर २०१९ या वर्षात बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली आहे. यानंतर सिद्धार्थ ‘पठाण’ चित्रपटामध्ये व्यस्त झाला तर रॅम्बो सुरू करण्याचे काम राहून गेले.शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्या सोबत  पठाण चित्रपटाचे शूटिंग चालू आहे आणि रॅम्बो चित्रपटाबद्दल काहीही बोलले जात नाहीये. २०२१ अखेरपर्यंत पठाण चे शूटिंग संपेल अशी आशा आहे.

यानंतरही रॅम्बोवर चर्चा होत नाही. सिद्धार्थ दिग्दर्शित करणाऱ्या वॉर 2 चे काम चालू झाले आहे. रॅम्बोशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट थांबलेला नाही,  यात काहीच हलचल नाही हे खरे आहे. आजची परिस्थिती पाहता चित्रपटाला उशीर झाला आहे. शूटिंग सुरू होण्यास बहुदा महिने लागले.

You might also like