‘डियर मॉम’मध्ये झळकणार टिया वाजपेयी

टिया वाजपेयीला आगामी “डियर मॉम’ चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऍलन जॉर्ज जेम्स करणार आहे. या चित्रपटात टिया ही अशा एका महिलेची भूमिका साकारत आहे, जी सरकार विरोधात लढताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला वर्षाच्या प्रारंभी सुरुवात करण्यात आली होती.

‘भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे’

मात्र, लॉकडाऊनमुळे शूटिंग रखडले असून आता नियम शिथिल करण्यात आल्याने चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. टिया म्हणाली, “डियर मॉम’ची कथा ही मी साकारत असलेल्या भूमिकेभोवती फिरताना दिसून येते. हा चित्रपट या वर्षाअखेर रिलीज करण्यात येणार होता. पण आता तो पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

‘फजच्या पट्ट्याने आवळला सुशांतचा गळा’; जवळील व्यक्तीने केलं धक्कादायक विधान

टियाने तिच्या आगामी योजनांवरही भाष्य केले. ती म्हणाली, असे बॉलीवूडमधील काही चित्रपट आहेत ज्याचा मी विचार करीत आहे. पण सध्या लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वप्रथम “डियर मॉम’च्या शूटिंगची वाट पाहत आहे.

You might also like