हिंदुस्तानी भाऊला जीवे मारण्याची धमकी…..!

हिंदुस्तानी भाऊ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी तो चक्क आएसआईमुळे चर्चेत आहे. या पाकिस्तानी संस्थेने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा धक्कादायक आरोप त्याने ट्विट करत केला आहे.

ट्विट हिंदुस्तानी भाऊने सांगिलते आहे की , “आएसआईच्या लेफ्टिनेंट कर्नलने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले त्यांचे लोक आपल्या शहरात आले आहेत. ९२३४७३९९९३००, +४४७७५४५३४३२४ या नंबर्सवरुन मला धमकीचे फोन आले होते. त्यांची रेकॉर्डिंगसुद्धा मी केली आहे.”  त्याने आपले ट्विट्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना देखील टॅग केले आहेत. हिंदुस्तानी भाऊचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

You might also like