असा होणार तुला पाहते रे या मालिकेचा शेवट?

‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.  विक्रांत सरंजामेचे लग्न झालं असल्याचं ईशाला समजलं. त्यामुळे त्यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला. पण त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि ईशा हीच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं समोर आले.

विक्रांतनेच राजनंदिनीला मारले होते अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत घडताना पाहायला मिळाल्या. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ईशा विक्रांतला माफ करणार का असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. विक्रांतचा मालिकेत मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

आता मालिकेची कथा निर्णायक वळणावर येत अखेर येत्या २० जुलै रोजी समाप्त होईल असं समजतं आहे. मालिकेचा शेवटचा भाग २० जुलै रोजी प्रसारीत होईल आणि याच दिवशी विक्रांत-ईशाच्या कथेचा शेवट पहायला मिळेल.

You might also like