देवळात जाताना या टिव्ही अभिनेत्रीचा मृत्यू

कन्नड टिव्ही अभिनेत्री शोभा यांचा मृत्यू झाला आहे. शोभा यांचा ‘मगालु जानाकी’ शो खूप लोकप्रिय आहे. या शोने त्यांना खूप लोकप्रियत्ता मिळवून दिली होती.  या शोचे दिग्दर्शक आणि फिल्ममेकर टीएन सीताराम यांनी फेसबुकवरुन पोस्ट शेअर करून ही दु:खद बातमी दिली.

त्यांनी या मालिकेत आनंद बेालगुर यांच्या आईची भूमिका साकारली होती.आयबी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, शोभा यांच्याशिवाय गाडीत अन्य चार जण होती त्यांच्यादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. हे सगळे एका कारमध्ये कर्नाटकच्या चित्रादुर्गावरुन जात असताना त्यांच्या गाडीला एक ट्रकला टक्कर दिली.

रिपोर्टनुसार,  गाडीत 8 लोक होते ज्यापैकी 5 लोकांचा मृत्यू झाला आहे बाकी तिघांना गंभीर रित्यादुखापत झाली आहे. सगळेजण बनाशंकरी मंदिरात जात होते त्यावेळी हा अपघात झाला.