‘तुला पाहते रे’ च्या जागी आता येणार ‘ही’ नवी मालिका

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेनं रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.अखेर येत्या २० जुलै रोजी समाप्त होईल असं समजतं आहे. २२ जुलै पासून या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची अग्गंबाई सासूबाई मालिका भेटीला येणार आहे.

 

‘तुला पाहते रे मालिकेत खूप टर्न अँड ट्विस्ट येत गेले. विक्रांत सरंजामेचे लग्न झालं असल्याचं ईशाला समजतं. त्यानंतर लग्न होतं आणि ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं समोर येतं. विक्रांतच राजनंदिनीला मारतो अशा बऱ्याच गोष्टी मालिकेत घडताना पाहायला मिळाल्या. आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

You might also like