‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘ही’ व्यक्ती येणार बिग बॉसच्या घरात

भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि तो शो आहे. अभिनेता सलमान खानचा “बिग बॉस” लवकरच ‘बिग बॉस 14’ सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही चाहते या शोसाठी खूप उत्साहित आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री ‘दिशा वकानी’ अर्थात दयाबेन ची. लवकरच ती ‘बिग बॉस 14’च्या घरामध्ये दिसणार असल्याचं कळतंय

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली. त्यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीनं प्रसूती रजेनंतर या मालिकेचा निरोप घेतला होता.

You might also like