लग्नानंतरही रणवीरसाठी ही व्यक्ती आहे ‘खूप स्पेशल’

 

दीपिकासाठी रणवीरचा प्रेम काही लपून राहिलेलं नाही परंतु, करिअरच्या सुरुवातीच्या काळात रणवीर दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा आणि महत्त्वाचं म्हणजे दीपिकाशी लग्नानंतरही अनुष्का आपल्यासाठी अजूनही खास असल्याचं नुकतंच रणवीरनं एका मुलाखतीत म्हटलंय. अनुष्काचं माझ्या लग्नात येणं खूपच स्पेशल होतं, असं रणवीरनं म्हटलं.

अनुष्का आणि रणवीर या जोडीनं ‘बँड, बाजा, बारात’ या सिनेमातून एन्ट्री घेतली.आणि सोबतच सुरू झाली या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. दोघांनी एकमेकांना काही काळ डेटही केलं. परंतु, त्यांचं नातं काही दीर्घकाळ टीकू शकलं नाही.

अनुष्का शर्मा डिसेंबर २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकली तर नोव्हेंबर २०१८ मध्ये दीपिकासोबत रणवीर सिंहनंही आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like