……म्हणून इशाने ठोकला ‘माझ्या नव-याची बायको’ला राम राम

इशा केसकर हिच्या कारकिर्दीला ओळख मिळाली ती ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेमुळे. रसिका सुनिलने मालिका सोडल्यानंतर इशाने आपल्या हटके स्टाईल मधून प्रेक्षकांसमोर उभी केली. लॉकडाऊननंतर लवकरच आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार म्हणून चाहते उत्सुक असतानाच नुकतीच एक दणका देणारी बातमी मिळाली. ती म्हणजे नवी शनाया जाऊन पुन्हा आधीची जुनी शनाया येणार आहे.

रसिका सुनिल चाहत्यांच्या भेटीला येणार. ही जरी आनंदाची वार्ता असली तरी , नेमकं इशा केसकर ही मालिका का सोडते हा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला. सर्वत्र याच चर्चा रंगू लागल्या. म्हणूनच मग या व्हिडीओद्वारे इशाने खास चाहत्यांसाठी स्पष्टीकरण दिलं आहे.

“लॉकडाऊननंतर सेटवर परतायला मी खुपच उत्सुक होते. मलासुध्दा तुम्हाला भेटायची इच्छा आहे. माझ्या सेटवरच्या सर्व सहकलाकारांना आणि टीमला भेटण्यासाठी मी आतुरते, पण काय करणार ह्या हेल्थ इश्यूमुळे मला आत्ता शूटींग करणं शक्य नाही, म्हणूनच शो मस्ट गो ऑन……मी सर्वांना खुप मिस करणार हे मात्र नक्की. पण लवकरच नवं काहीतरी घेऊन तुमच्या भेटीला नक्कीच येईन.” असे इशाने एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

You might also like