माझ्यासाठी हा एक अतिशय रोमांचक काळ – सान्या मल्होत्रा

नुकताच सान्या मल्होत्राच्या आगामी “शकुंतला देवी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय तिच्या “लुडो’ चित्रपटाविषयी एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. सान्या म्हणाली, “माझ्यासाठी हा काळ खूप रोमांचक आहे. आधी “शकुंतला देवी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर नेटफ्लिक्सवर “लुडो’च्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे.
“शकुंतला देवी’च्या ट्रेलर पाठोपाठ लुडोची घोषणा करण्यात आल्यानंतर मला मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आहे. कालपासून कुटुंब आणि मित्रांकडून आलेल्या शुभेच्छांमुळे मी भारावून गेली आहे आणि मी आनंदी आहे की त्या दोन घोषणा एकत्रीत करण्यात आल्या. लॉकडाऊननंतर पुन्हा चांगली बातमी मिळविणे नेहमीच आनंददायक असते असे तिने सांगितले आहे.
दरम्यान, सान्या मल्होत्रा “शकुंतला देवी’मध्ये शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बनर्जीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाविषयी सान्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे.