‘ठाकरे’ चित्रपटामुळे ‘या’ सिनेमाने बदलली प्रदर्शनाची तारीख

‘ठाकरे’ हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या दिवशी दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका होती. या भूमिकेला पाठिंबा देत अनेक सिनेमा मेकर्सने आपल्या सिनेमांची रिलीज डेट बदलली आहे.

कंगना रानावतचा बहुचर्चित सिनेमा ‘मणिकर्णिका’च्या मेकर्सने आपल्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. तसेच आता इमरान हाशमीच्या ‘चीट इंडिया’ या सिनेमाच्या संपूर्ण टीमने हा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण आता अशी माहिती मिळते की, हा सिनेमा एक आठवडा अगोदर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे आता हा सिनेमा १८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like