‘खतरों के खिलाडी १०’मध्ये झळकणार हे स्पर्धक?

अधिक अॅक्शन स्टंटसह ‘खतरों के खिलाडी’ पुनरागमन करणार आहे. ‘खतरों के खिलाडी’ पर्व १० लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या पर्वामध्ये अमृता खानविलकर सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते. आता या शोमध्ये आणखी कोणते स्पर्धक सहभागी होणार हे समोर आले आहे.

अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे सांगितले आहे.

करण पटेल,  धर्मेश येलांदे, अदा खान, तेजस्वी प्रकाश, बलराज सयाल,  करिश्मा तन्ना,  शिविन नारंग, आर जे मलिश्का,  राणी चॅटर्जी, क्रिकेटपटू युवराज सिंग हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.