‘ही’ अभिनेत्री झळकणार हॉलिवूडमध्ये

दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा या अभिनेत्रींच्या पाठोपाठ आता बॉ हुमा कुरेशी सुद्धा हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यास सज्ज झाली आहे. ‘आर्मी ऑफ द डेड’ चित्रपटाच्या माध्यमातून हुमा हॉलिवूड गाजवणार आहे.
तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुमाच्या हॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली आहे. ‘आर्मी ऑफ द डेड’ चित्रपटाच्या माध्यमातून जॅक स्नायडर, जॉम्बी शैली पुन्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहेत.
जॅक स्नायडर यांच्या ‘आर्मी ऑफ द डेड’ चित्रपटात हुमा भूमिका साकारणार आहे. मुख्य भूमिकेसाठी हुमाची निवड करण्यात आली आहे. हुमा शिवाय चित्रपटात एला पुर्नेल, ऍना डे ला रेगुएला आणि थियो रॉसी हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.