‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीने दिले दोन जुळ्यांना जन्म

‘जमाई राजा’ फेम सारा आफरिन खान आई बनली आहे. साराने दोन जुडवा मुलांना यूकेमध्ये जन्म दिला आहे. साराची योगा ट्रेनर जेन यांनी सोशल मीडियावरुन साराच्या प्रेग्नंसीबाबत माहिती दिली.
साराने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुडवांना जन्म दिला. तिने मुलाचं नाव झिदेन आणि मुलीचं नाव अलीझा असं ठेवलं आहे. सारा लग्नानंतर तिच्या पतिसोबत यूकेमध्ये राहत आहे. साराचे पती प्रसिद्द मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.
सारा २००९ मध्ये लग्नबंधनात अडकली. सारा आफरिन खानने रवि दुबे आणि निया शर्मा यांच्यासोबत ‘जमाई राजा’ या मालिकेत काम केलं आहे.