‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट ‘कंचना’चा रिमेक आहे.

एका वृत्तानुसार, या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत तरुण अरोरा दिसणार आहे. तरुणने २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने करीनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, रिमेकप्रमाणे या चित्रपटातही व्हिलन एक भ्रष्ट आमदार असणार आहे. ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.