केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, ‘या’ अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला होता. चित्रपट निर्मितीसह सर्वच उद्योग-व्यवसाय हे या काळात बंद होते. तर, सलमान खान या लॉकडाऊनमुळे त्याच्या फार्म हाऊसवर अडकला होता. तो सध्या तिथेच असून वेगवेगळी गाणी तसेच फोटोशूट करून तो सद्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

तर, परवाच त्याने एक चिखलात माखलेला फोटो सर्व सोशल अकाउंट वरून शेअर केला असून, त्याने ‘Respect to all the farmers…’ म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना आदर व नमन या भावनेचा संदेश देखील त्याने दिला होता. पण या फोटो नंतर सलमान खानला अनेकांनी ट्रोल केले असून त्याचे मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अनेकवेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असल्येला अभिनेता कमाल आर खानने देखील सल्लू भाईची चेष्टा उडवली आहे.  “आता रडून काय फायदा? जी पापं केली आहेस त्याची फळं तुला भोगावीच लागतील.” असं ट्विट त्याने केलं आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तर यावर सलमानच्या चाहत्यांनी देखील कमाल खानवर जोरदार टीका केली आहे.

तर, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर नेपोटीजम विरुद्ध आवाज उठवण्यात आला होता. यावरून देखील अनेकांचे करिअर उध्वस्त केल्याप्रकरणी सलमान खान याला ट्रोल करण्यात आले होते.

 

You might also like