‘या’ अभिनेत्यानेही केली ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहाची पोलखोल

ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी सही रे सहीचा प्रयोग सुरू असताना एसी बंद असल्यामुळे कलाकारांना असह्य उकाड्यात प्रयोग करावा लागला आणि ही बाब सोशल मिडियाच्या माध्यमातून भरत जाधवने लोकांसमोर आणली. याला २४ तास उलटून गेल्यावरही त्याच नाट्यगृहात जैसे थेच परिस्थिती होती.
अभिनेता आस्ताद काळे याच्या नाटकाचा रविवारी घाणेकर नाट्यगृहात प्रयोग होता. आणि नाट्यगृहातील प्रसाधनगृहात पाण्याचा अपव्यय होत होता. वाया जाणाऱ्या पाण्याचा हा व्हिडिओ आस्तादने सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला.
आस्तादने पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये कलाकारांसाठी असणा या ग्रीन रूममधील प्रसाधनगृहात सतत वाहणारं पाणी स्पष्टपणे दिसत आहे. आणि यावर घाणेकर नाट्यगृहाची जबाबदारी असणा या कर्मचायांचा कोणताही अंकुश दिसून येत नाहीये. गेल्यावर्षी या नाट्यगृहातील स्लॅब कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी नाटकाचा प्रयोेग सुरू नसल्याने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही . त्यानंतर प्रशासनाने नाटयगृहाच्या नूतनीकरणासाठी हे नाट्यगृह अनेक दिवस बंद केलं होतं. मात्र वारेमाप पैसा खर्च करूनही अजूनही नाट्यगृहातील सेवा पूर्ववत का होत नाहीत ?असा सवाल रंगकर्मींकडून विचारला जातोय.
Posted by Aastad Sunita Pramod Kale on Sunday, July 21, 2019
Posted by Aastad Sunita Pramod Kale on Sunday, July 21, 2019