‘पती,पत्नी और वो’च्या सिक्वलमध्ये ‘या’अभिनेत्याची वर्णी

आतापर्यंत अनेक नावाजलेल्या चित्रपटांचे सिक्व लकरण्यात आले आहेत. यामध्ये ९० च्या दशकातील सुद्धा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.आता लवकरच ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटाचा सिक्वल तुमच्या भेटीला येणार असून या सिक्वलमध्ये अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू ही कलाकार मंडळी झळकणार असल्याचं चर्चा होती.
‘पिपिंगमून’च्या वृत्तानुसार, या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण फेब्रुवारीमध्ये सुरु होणार असून कार्तिक आर्यन व्यतिरिक्त या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे स्पष्ट झालेलं नाही.
मुदस्सर अजीज ‘पती,पत्नी और वो’ च्या सिक्वलचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जुनो चोपडा आणि अभय चोपडा टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –