‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘हे’ आहेत ‘लव्हबर्ड’

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी फुलताना दिसतेय.
‘बिग बॉस मराठी २’च्या घरातील लव्हबर्ड्स म्हणजे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले. रूपाली आणि पराग यांचं घरातील वावरणं पाहून सदस्यांनाही यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली आहे.
दुसऱ्या दिवसापासूनच या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर रुपाली नेलपॉलिश लावत गप्पा मारत असताना परागनं ती बाटली हातात घेत तिच्या पायांना नेलपॉलिश लावून दिलं.
इतकंच नव्हे तर रुपालीला नॉमिनेशन टास्कपासून वाचवण्यासाठी तो वैशाली म्हाडेला विनंती करताना दिसतो. नॉमिनेशन टास्कमध्ये जर त्याने नेहाला वाचवलं तर वैशालीनं रुपालीला वाचवायचं अशी डीलसुद्धा त्याने केली.