माधुरीने शेअर केलेल्या ‘या’ फोटोची होत आहे जोरदार चर्चा

माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. लॉकडाउनच्या काळात माधुरी इन्स्टाग्रामवर अनेक वेळा व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत केले. अलिकडेच माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

माधुरीच्या या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा माधुरीने दिलेलं कॅप्शन अनेकांच लक्ष वेधत आहे. माधुरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील फोटो शेअर केला आहे.

या फोटोला तिने कॅप्शन म्हणून एक शायरी जोडली आहे. ज्यामुळे अनेकांचं लक्ष या फोटोकडे वेधलं जात आहे. “लाकर थोड़ी सी खुशी अपने चेहरे पर, हमने खुद को दूसरों से अलग बना लिया, लोग ढूंढ़ते रहे मुस्कुराने का कारण, हमने दूसरों की खुशी को अपना बना लिया,” असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे.अलिकडेच ती कलंक आणि टोटल धमाल या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकणार आहे.

 

You might also like