‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सडक 2

आलिया भट्टच्या “सडक 2′ चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या पोस्टरद्वारे चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. आलिया भट्टने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्तसह आलिया भट्ट आणि आदित्य रॉय-कपूर गिटार आणि बॅग घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

आलिया भट्टने ट्‌विट करत पोस्ट केले की, “सडक 2′, प्यार की राह, 28 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर स्ट्रिमिंग होईल. काही दिवसांपूर्वी आलियाने “सडक 2′ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती आणि आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही आली आहे.

1991च्या “सडक’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. यात पूजा भट्ट आणि संजय दत्तची जोडी दिसली होती, तर “सडक 2’मध्ये ही जोडीही एका खास भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दरम्यान, महेश भट्ट यांनी 21 वर्षांनंतर “सडक 2’मधून पुन्हा दिग्दर्शकाची जबाबदारी पार पडली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. यापूर्वी त्यांनी 1999 साली “कारतूस’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

You might also like