येत्या १ ऑगस्टला ‘Once मोअर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’…. एका नवरा बायकोच्या नात्यांतील अशाच रहस्याचा उलगडा करणाऱ्या आगामी ‘Once मोअर’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीझरची झलक प्रकाशित करण्यात आली. येत्या १ ऑगस्टला ‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल, असा विश्वास दिग्दर्शक नरेश बिडकर आणि चित्रपटाच्या लेखिका श्वेता बिडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.  वेगवेगळ्या पठडीतली 3 गाणी या चित्रपटात आहेत. श्वेता बिडकर लिखित या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकर, नकाश अजिज, हमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.