‘आर्टिकल-१५’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘आर्टिकल-१५’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती.

धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांमध्ये होणारा भेदभाव इत्यादी विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. चित्रपटात आयुषमान एका पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘आर्टिकल-१५’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. २१व्या शतकात सुद्धा जनता जात, पात, लिंग, वंश इत्यादींच्या जाळ्यात अकलेला आहे. यंदाच्या वर्षी २८ जून रोजी ‘आर्टिकल-१५’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

You might also like