लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘भारत’ चित्रपटाचा टीजर

सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचे टीजर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे टीजर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सलमान खान, कटरीना कैफ, तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. निर्माता अतुल अग्निहोत्रीने ट्विटरवर भारत चित्रपटाच्या टीजरची एक झलक शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत अतुल अग्निहोत्रीने Countdown begins असे कॅप्शन दिले आहे.

भारत चित्रपट २०१९ मध्ये ईदला रिलीज होणार आहे.या चित्रपटात सलमान ५ वेगवेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या समोर येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like