‘या’ चित्रपटात सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांनी गायले तामिळ गाणं

काही दिवसं पूर्वीच ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि टायटल सॉंग प्रदर्शित झाले. या चित्रपटात महत्त्वाची बाब म्हणजे सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी या दोघांनी एक रोमँटिक तामिळ गाणं गायले आहे. लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवकुमार पार्थसारथी यांनी ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –