नियमावलीचं पालन करत ‘या’ मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमा यांच शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे. १३ जुलै पासून काही मालिकेचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तसेच या काळात एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

अभिनेता प्रथमेश परब याची मुख्य भूमिका असलेल्या डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. आखून दिलेले नियम आणि अटी यांचं पालन करत या चित्रपटातील एक अखेरचं राहिलेलं गाणं नुकतंच चित्रीत झालं आहे. त्यामुळे आता हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून पहिल्यांदाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती सागर पाठक, सूरज दगडे-पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. तसंच अमोल कागणे यांनी देखील सहयोगी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे.

या चित्रपटात अमोल कागणे झळकणार असून त्यांच्या व्यतिरिक्त अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

माधुरीने शेअर केलेल्या ‘या’ फोटोची होत आहे जोरदार चर्चा

 

You might also like