दीपिका पदुकोनच्या आगामी चित्रपटांचा धडाका

दीपिकाचा “छपाक’ हा चित्रपट खूपच गाजला होता. यानंतर तिच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाचं आकर्षण आहे. दीपिकाच्या आगामी पाच चित्रपटांची सध्या चर्चा आहे. कबीर खान यांचा चित्रपट “83′ हा आतापर्यंत प्रदर्शित व्हावयास पाहिजे होता.

भावनिक झाली रामायणातील सीता म्हणाली….

मात्र करोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट आता डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका रोमी देव हे पात्र साकारत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दीपिका-रणवीर ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

दीपिकाचा दुसरा चित्रपट मधू मंटेना यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका द्रोपदीचे पात्र साकारणार आहे.  प्रभास याच्या सोबत दीपिकाचा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अजून ठरलेली नाही.

रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीसांना झापलं म्हणाल्या….

शकून बत्रा यांचा चित्रपट दीपिकाचा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शुटिंगची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे हे शुटिंग पुढे ढकलावे लागले. या चित्रपटात दीपिकासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी भूमिका साकारणार आहेत. दीपिकाचा पाचवा चित्रपट, रॉबर्ट डी नीरोच्या “इ इंटर्न’च्या रिमेकमध्ये आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

You might also like