‘या’ अभिनेत्या सोबत पूजा बत्राने केले दुसरे लग्न, पाहा फोटो

पूजा बत्रा कोणताही गाजावाजा न करता विवाहबंधनात अडकल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात समोर आले. त्यानंतर आता पूजाने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. नवाब शाहशी तिने लग्नगाठ बांधली आहे.
पूजा कधीकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जायची. 2002 मध्ये पूजाने डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेला जाऊन स्थायिक झाली. 9 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि ती भारतात परत आली. आता तिने नवाब शाहसोबत दुसरे लग्न केले आहे.