‘खानदानी शफाखाना’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काकांच्या मृत्यूनंतर त्यांचा सेक्स क्लिनीकची संपू्र्ण जबाबदारी सोनाक्षी कशाप्रकारे पेलते, हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या मध्यमातून करण्यात आला आहे.

सेक्स क्लिनीक चालवणाऱ्या मुलीला समाजाकडून कसा विरोध होतो, याचा प्रत्यय देखील चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पा दास यांनी केले आहे.

सेक्स विषयावर उघडपणे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘सेक्स संबंधीत समस्यांवर उघडपणे मत मांडण्यात आले तर त्यांचे निराकरण करण्यात सोपे होईल. भारतात अद्यापही सेक्स विषयावर बोलताना मनात संकोच असतो. त्यामुळे हा चित्रपट साकारण्यात आल्याचं शिल्पा म्हणाल्या. खानदानी शफाखाना’ २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.