सुबोध भावाचा नवीन चित्रपट लवकरच तुमच्या भेटला येणार

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता तो लवकरच नवीन भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘विजेता’ या सिनेमातून तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी सुबोध खूप मेहनत घेतो आहे. नुकताच या सिनेमाचा मुह्रुर्त पार पडला. अमोल शेडगे  या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स ह्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

दरम्यान सुबोधसह या सिनेमात माधव देवचकेही झळकणार आहे. खुद्द माधवनेच मुह्रूर्त झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गुड न्युज शेअर केली आहे. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे.

You might also like