….तर ‘हे’ आहे सलमान – भन्साळींच्या चित्रपटाचे नाव

तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान आणि संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी स्वत: दिग्दर्शित करतील. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाचे नाव समोर आले आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान व भन्साळी लवकरच ‘हम दिल दे चुके सनम 2’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. १९९९ मध्ये प्रदर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान व भन्साळीची जोडीने कधीच एकत्र काम केले नाही. पण आता १९ वर्षांनंतर ही जोडी ‘हम दिल दे चुके सनम 2’ घेऊन येतेय. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असेही कळतेय. या चित्रपटात सलमानची हिरोईन कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण त्याचीही चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात प्रियंका चोप्राची वर्णी लागेल, असे मानले जातेय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like