‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

 सिद्धार्थ आणि मृण्मयी चाहत्यांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्कच आहे.

‘मिस यू मिस्टर’ असे या चित्रपटाचे नाव  आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला मृण्मयी आणि सिद्धार्थ हटके अंदाजात दिसत आहेत. सगळं काही सुरळती सुरु असताना अचानाक करिअरच्या संधीसाठी सिद्धार्थला परदेशात जावे लागते. तेथून त्यांच ‘लॉंग डिस्टनस रिलेशीप’ सुरु होते.

काही काळानंतर एकमेकांनी दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. दोघांमध्ये भांडणे होण्यास सुरुवात होते असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.