‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रहस्यमयी ‘मिरांडा हाऊस’ चित्रपट

सध्या मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चित्रपट येत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिगदर्शक राजेंद्र तलक यांनी दिग्दर्शित केला असून इरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटात मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष, साईंकित कामत हे दिसणार आहे. याआधी देखील अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण ‘मिरांडा हाऊस’ हा चित्रपट या सगळ्यामध्ये नक्की वेगळा असेल यात शंका नाही. ‘मिरांडा हाऊस’ हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –