परमेश्वर आपली परीक्षा घेतोय ; संजय दत्तच्या पत्नीची भावनिक प्रतिक्रिया

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती नुकतीच समोर आली. मात्र, याबाबत संजय दत्त आणि त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

दरम्यान, आज संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने याबाबत आपली प्रतिक्रिया जारी केली आहे.“मी सर्व हितचिंतकांप्रती आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे.”

“गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे”, असं मान्यता दत्त म्हणाली.

You might also like