गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये  दिवसांपूर्वी चकमक झाली होती. या चकमकीत २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं तर काही जवान जखमी सुद्धा झाले होते. तर भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.  ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. “अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही,” असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे.

 

‘या’ विधानामुळे सैफ सोशल मिडियावर झाला ट्रोल

You might also like