फ्रंट ऑफ द कॅमेरा काम करण्यातली मज्जा काही औरच! – निर्माता-अभिनेता अमोल कागणे

‘हलाल’, ‘परफ्युम’, ‘लेथ जोशी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचानिर्मितीकार अमोल कागणे आता ‘बाबो’ या आगामीचित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असून हा चित्रपट३१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पदार्पणातच एक नाअनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता म्हणजे एकअजब रसायनच आहे. हा मेडिकलचा स्टुडन्ट आपल्याफावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणित्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसलीअसं म्हणता येईल. बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्याफ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय. पहिल्यांदाच स्वतःला हिरोच्याभूमिकेत पाहताना त्याला काय वाटतंय हे ‘बाबो’ चित्रपटाच्यानिमित्ताने सांगतोय अमोल कागणे…

निर्मितीक्षेत्रातून अभिनयक्षेत्रात का वळावं असं वाटलं?
मुळातच मला अभिनयाची आवड आधीपासून होती. निर्मितीक्षेत्रात मी चुकून आलो. हे क्षेत्र सुरुवातीला माझ्यासाठी नवीनहोतं. माझं बॅकग्राउंड आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांचा कुठेहीताळमेळ बसत नसताना मी मनोरंजन क्षेत्राशी जोडलो गेलो. मेडिकलच्या हेक्टिक शेड्युलमधून जरा मोकळीक मिळावीम्हणून कॉलेजच्या नाटकांमध्ये काम करू लागलो. माझेआजोबा (आईचे वडील) नाटक बसवायचे त्यांचा वारसामाझ्याकडे आला असावा कदाचित. माझ्या वडिलांनी मात्रसर्वसाधारण मध्यमवर्गीय वडिलांसारखा एकच प्रश्न विचारला, ”फक्त नाटकंच करणारेस की शिक्षण पण पूर्ण करणारेस”?.मी माझं मेडिकल कम्प्लिट करेनच पण नाटक सुद्धा शिकेनअसं त्याचवेळी ठरवलं, त्याप्रमाणे मेडिकल नंतर पुण्यातीलललित कलाभवन मधून नाट्यशास्त्रात पदवी देखील घेतली. त्यानंतर हलाल चित्रपट मी शिवाजी लोटन पाटीलयांच्यासोबत कला …

निर्माता आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांमध्ये फरककाय जाणवतो आणि तुला कुठली भूमिका अधिक प्रियआहे?
फ्रंट ऑफ द कॅमेरा काम करण्यातली मज्जाच काही औरआहे. एक अभिनेता म्हणून तुम्ही आणि तुमचं काम इतकंचसांभाळता. लेखकाने लिहिलेल्या संवादांना दिग्दर्शकाच्यादृष्टिकोनातून एका अभिनेता म्हणून तुम्हाला प्रेक्षकांसमोरप्रेझेंट करायचं असतं. ज्यात खूप स्किल लागतं पण ही फेजएनजॉयेबल असते उलट बॅक ऑफ द कॅमेरा तुम्हालाएकाचवेळी खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. टेक्निकली तुम्हीखूप अडकता. त्यात एक नशा आहे अनडाऊटेडली पण रिस्कही आहे. मार्केटिंग आणि प्रमोशनची गणितं व्यवस्थित जुळलीकी बॅक कॅमेरा ही तुम्ही एन्जॉय करू शकता. पण हो मलाफ्रंट कॅमेरा काम करायला जास्त आवडतं.

‘बाबो’ मध्ये तुझी भूमिका काय आहे आणि भविष्यातकुठल्या प्रकारव्हाच्या भूमिका तुला करायलाआवडतील?
‘बाबो’ मध्ये मी लीड रोल मध्ये आहे. बबलू नावाची व्यक्तिरेखामी साकारत असून ही भूमिका एका प्रेमात आकंठ बुडालेल्यायुवकाची आहे. बबलू हा गावातला एकमेव इंजिनीअर आहे. जो सालस आणि तितकाच प्रेमळ आहे. त्याचंलहानपणापासून आपल्या मुन्नी नावाच्या बालमैत्रिणीवर प्रेमआहे पण त्याला ते सांगता येत नाही. त्याच्या मनाची तगमगमुन्नीपर्यंत पोहोचते का? मुन्नी त्याला स्वीकारते कि नाही आणिजर ती हो म्हटली तर घरचे लग्नाला तयार होतील का? यासगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘बाबो’ देतो. बबलू साकारताना मलाखूप मजा आली. याआधी नाटकांमध्ये मी मालकापासून-नोकरापर्यंत सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह दोन्ही व्यक्तिरेखा मी केल्या आहेत पणमला सर्वात जास्त ग्रे शेड करायला आवडते. त्यात मी खूपकम्फर्टेबल असतो.
आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगशील?
सध्या मी ६ मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे. काहीमहिन्यांच्या गॅपनंतर हे चित्रपट प्रदर्शित होतील. सध्या ‘बाबो’मी लीड हिरो असणारा चित्रपट ३१ ला मे ला प्रदर्शित होतोय. राजू पार्सेकर यांच्या ‘अहिल्या’ चित्रपटामध्ये सुद्धा मी एकाविशेष भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ‘अहिल्या’ प्रेक्षकांच्याभेटीस येणार आहे. आणखी ही काही शोज आणि गाण्यांचीऑफर मला आलाय आहेत. लवकरच तुम्हाला माझ्यातल्याअभिनेत्याची विविध रूपे पाहायला मिळतील.
