‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे पहिले गाणे प्रदर्शित!

अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे आज प्रदर्शित झाले आहे.

‘1947 ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्याच्या मुखड्यावर आधारित शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे टायटल ट्रॅकही बनवले आहे. या संपूर्ण गाण्यात राजकुमार राव सोनमच्या प्रेमात बेभान झाल्याचे दिसतोय.

रोचक कोहलीने या गाण्याला संगीत दिले आहे. रोचक कोहली आणि दर्शन रावेल यांनी हे गाणे गायले आहे. गुरप्रीत सैनीने या गाण्याला शब्दबद्ध केले.या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि सोनम कपूर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जुही चावलाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या १ फेबु्रवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like