ठाकरे चित्रपटाचा पहिला शो पहाटे ४.१५ ला प्रदर्शित

25 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या दिवशी निश्चित वेळेच्याआधी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदाच कुठल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला शो हा निश्चित वेळेच्याआधी प्रदर्शित केला जाणार आहे.

वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये पहाटे ४.१५ वाजताचा ‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला शो हा ठेवण्यात आला आहे. लोकांच्या मनात ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. लोक बाळासाहेबांची सुरुवात कशी झाली, हे बघण्यासाठी खूप उत्सूक आहेत. लोकांना त्यांच्याबाबत जाणून घ्यायचे आहे. म्हणून या चित्रपटाची महाराष्ट्रात खूप मागणी असल्याचे आयमॅक्सच्या चालकांनी स्पॉटबॉयला सांगितले.

सकाळी सात वाजता साधारणपणे कुठल्याही चित्रपटाचा पहिला शो हा प्रदर्शित केला जातो. पण एखाद्या चित्रपटाला पहाटे ४.१५ ला प्रदर्शित करणे हे पहिल्यांदाच होत आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा चित्रपटा प्रदर्शित होईल.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like