अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्याची तयारी आणि त्यामागील खरी गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक झलक चाहत्यांना टीझरच्या माध्यमातून अनुभवता येत आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल करण्यात करण्यात येणार आहे

 

You might also like