‘या’ अभिनेत्याने केली कोरोना टेस्ट

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय अभिनेता अनुपम खेर यांच्याही घरातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.दरम्यान, नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे.
त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे आणि त्यासोबतच लवकरच कोरोना टेस्ट होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला करोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार ३८५ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.