प्रवीण तरडे घेऊन येणार हंबीरराव मोहिते यांची शौर्यकथा

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सरसेनापतीपदाची धुरा वाहणारे हंबीरराव मोहित्यांची शौर्य कथा चित्रपटाच्या स्वरुपात समोर येणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असणार आहे.

“हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.” तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून २०१९ रोजी होणार आहे. हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही विण विठ्ठल तरडे यांनी सांगितले”.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like