एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाची गोष्ट सांगणार ‘भेद’ चित्रपट

एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनल निर्मित ‘भेद’चे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मातीतले अस्सलपणा असलेली दोन पिढ्यांमध्ये रंगणारी ही प्रेमाची गोष्ट, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. शाम-राधा, मनाली-भिवा ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करतील असा विश्वास निर्मात्यांना आहे. या चित्रपटात अजित गाडे, श्लेषा मिश्रा,अभिषेक चौहान आणि डॉ.राजेश बक्षी मुख्य भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –