‘बाटला हाऊस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा बहुचर्चीत ‘बाटला हाऊस’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2.55 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पोलिसाच्या वेषात असणारा जॉन भाव खाऊन गेला आहे. राजधानी दिल्लीत गाजलेल्या बाटला हाऊस एन्काऊंटरवर आधारित हा चित्रपट आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
19, सप्टेंबर, 2008 मध्ये दिल्लीत जामिया नगर भागातील बाटला हाऊस भागात आतिफ अमीन आणि मुहम्मद साजिद नावाचे दोन दहशतवादी पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले होते. हे दोनही दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीनसी संबंधीत होते. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमने डीसीपी संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारली आहे. जॉनसह मृणाल ठाकूर आणि रवी किशन यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. निखील आडवाणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉनने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे.