या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘द बार्ड ऑफ ब्लड’

सेक्रेड गेम, सिलेक्शन डे, इनसाइड एज, चॉपस्टीक या वेब सिरीज सध्या चांगल्या गाजत आहेत. त्यातच आता भर म्हणून शाहरुख खानच्या रेडचिलीज् निर्मिती ‘द बार्ड ऑफ ब्लड’ ही नवी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिलाल सिद्धीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे ही सिरीज आहे. ही सिरीज येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी, शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.