‘या’ अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या

तेलुगू टेलिव्हिजन अभिनेत्री नागा झांसी हिने बुधवारी हैदराबाद येथे श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती २१ वर्षीची होती.

आत्महत्येवळी नागा घरात एकटीच होती. नागा झांसी वारंवार बेल वाजवूनही दरवाजा उघडत असल्याने भाऊ दुर्गा प्रसाद याने पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिल्यानंतर नागा झांसीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले.

झांसीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. प्रेमप्रकरणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणतेही पुरावे किंवा माहिती मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –