रिंकू राजगुरूचा फॅट टू फिट प्रवास, पाहा फोटो

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आर्चीची भूमिका वठवून रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ सध्या फिट राहण्यासाठी डायट प्लॅन फॉलो करत आहे. चित्रपटात येण्यापूर्वी रिंकू आपल्या फिटनेसकडे फारसे लक्ष देत न्हवती.

सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला. तिने तब्बल 20 किलो वजन घटविले आहे. रिंकू राजगुरू दररोज पहाटे 4 वाजता उठून वर्कआऊट करते. इतकंच नाही तर तिने व्यायामासोबत डाएटकडेही विशेष भर दिला आहे.

रिंकू सकाळ आणि संध्याकाळी डाएट फॉलो करते. ती जास्त भर हा सलाडवर देते. त्याचप्रमाणे तिला गोड आवडतं पण वजन कमी करण्यासाठी तिने गोड खाणंही सोडून दिलं आहे.

दरम्यान, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने वजन घटविण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तिची ट्रेनर व डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच पाहिलं. रिंकूची आईच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या वर्कआऊट ची काळजी घेती.

रिंकूला प्रत्येक गोष्टीत आईने मदत केल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. या सगळ्याचा फायदा केवळ दोन महिन्यात तिने तब्बल वीस किलो वजन घटवल्याचंही तिने सांगितलं.

 

You might also like