माझे आई-वडिल वेगळे झाले हेच बरं झालं

सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा ‘सिम्बा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाला भूरळ पाडली.त्यामुळे आई-वडिल विभक्त असले तरी मुलीच्या यशाचा त्यांना आनंद तर असेलच.
साराने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या आई-वडिलांच्या विभक्त असण्यावर वक्तव्य केलं आहे. माझे आई-वडील वेगळे झाले हे एका अर्थी चांगलच झाले, असं साराने म्हटलं आहे. याचं कारणही तिनं सांगितलं आहे.
मी वडिलांसोबत एकत्र राहत नसले तरी ते माझ्या मदतीसाठी कुठेही असले तरी धावून येतील. त्यामुळे ते माझ्यासोबत नाहीत असं मला कधीच वाटलं नाही. मला माहिती आहे की ते दोघंही एकत्र कधीच खूश राहिले नसते आणि ते जर एकमेकांसोबत खूश नाहीत तर मीही आनंदी राहिले नसते, असं सारा म्हणाली.
महत्वाच्या बातम्या –
- हार्दिक पंड्याला ‘या’ अभिनेत्रीशी करायचे आहे लग्न…
- राकेश रोशन यांना कॅन्सर; हृतिक रोशनने केला खुलासा
- नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित पाहिलात का?
- ‘सोनचिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित