राजकारणातील “दीवार”

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा आणखी एक सुपरहिट चित्रपट म्हणजे “दीवार “. सलीम-जावेद यांच्या सकस लेखणीतून साकारलेला आणि अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या “रिल ” लाईफ मधल्या दोन भावांच्या अभिनयाच्या आणि तुफान डायलॉग्सची जुगलबंदी असणारा चित्रपट म्हणजे ‘दीवार’ .
हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाला नुकतीच ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. २४ जानेवारी, १९७५ रोजी हा चित्रपट रिलीझ झाला होता आणि तब्बल ४० वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का आणि हिंदुहृदयसम्राट असणाऱ्या शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित “ठाकरे ” हा चित्रपट आज रिलीझ होतोय.
या दोन्ही चित्रपटातील एक महत्वाचा सामायिक धागा म्हणजे “दीवार” चित्रपटामध्ये दोन्ही भावांच्या जगण्याच्या तत्वांमधला मतभेद आणि त्यांनी निवडलेले वेगवेगळे मार्ग यात दाखवले गेले होते तर आपल्या सगळ्यांना माहित असेलच कि मराठी माणूस हाच दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या “राज ” आणि उद्धव ” या दोघांनी आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वेगळे मार्ग यापूर्वीच निवडले आहेत . या दोघांच्यातील एकमेव श्रद्धास्थान म्हणजे “बाळासाहेब ठाकरे “.
मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या संरक्षणाचे दोघेही कडवे पुरस्कर्ते असले तरी दोघांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. हा जरी निव्वळ योगायोग असला तरी लोकसभा आणि विधानसभा यांच्या आगामी निवडणुका तोंडावर आहेत. आज प्रदर्शित झालेल्या “ठाकरे ” चित्रपटाचे व्यावसायिक यश आणि या दोन्ही भावांच्या भावी वाटचालीत काही नवे वळण निर्माण होईल का हे येणारा काळच ठरवेल.
टिम “नट” खट
महत्वाच्या बातम्या –
- भाऊ कदमवर गुन्हा दाखल करा….
- मी जे भोगले तुमची मुलंही भोगतील; माझा शाप आहे तुम्हाला – तनुश्री दत्ता
- सलमान खानने दिली प्रजासत्ताक दिनाची खास भेट, पाहा ‘भारत’चा धमाकेदार टीजर
- आली रे आली आपल्या नवीन गाण्यासहीत ‘ढिनचॅक पूजा’ आली